भारतीय मनोरंजन क्षेत्रातील लोकांच्या जीवनात दर्जात्मक सुधार घडवून आणण्यासाठी यश जौहर फाऊंडेशन तयार आहे. मनोरंजन क्षेत्रातील लोकांना योग्य संधी मिळवून देण्याबरोबरच त्यांची शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी यश जौहर फाऊंडेशन काम करणार आहे.

यश जौहर फाऊंडेशन हे यश जौहर यांच्या समाजाप्रती असलेल्या आत्मीयतेला वंदन करतं. यश जौहर हे कायम मनोरंजन क्षेत्रातील लोकांना आपलं देणं लागतं ही भावना घेऊन काम करायचे. चित्रपट व्यवसायात असणं हे फार कठीण काम आहे, याची जाण त्यांना होती. त्यामुळे ते कायम मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येकाच्या भावनिक आणि आर्थिक अशा दोन्ही मदतीसाठी तयार असायचे. त्यांच्या मदत आणि सहकार्यामुळे ते कायम अनेकांच्या स्मरणात रहातील. यश जौहर फाऊंडेशनची स्थापना ही यशजींचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी करण्यात आली आहे.

साथ – यश जौहर फाऊंडेशन व्हाट्सअप हेल्पलाईन क्रमांक - 8591223300

मनोरंजन क्षेत्रातील समाजाला योग्य आणि जलद वैद्यकीय सेवा तसेच इतर सहाय्यतेशी जोडण्यासाठी.

कशी मदत होणार?

समाजातील विविध घटकांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या काही अनुभवी आणि विश्वासू सहकार्यांच्या सोबतीने यश जौहर फाऊंडेशन हे ध्येय साकार करणार आहे.

यश जौहर फाऊंडेशनबद्दल

सहयोग, प्रतिसाद आणि सुविधा या मूल्यांची सांगड घालत, मनोरंजन क्षेत्रातील लोकांच्या उत्कर्षासाठी यश जौहर फाऊंडेशन तयार करण्यात आले. या तीन मूल्यांमुळे मनोरंजन क्षेत्रातील लोकांच्या जीवनात पुढील बदल घडवण्यात बळ मिळणार आहे.

आर्थिक सक्षमीकरण

दिर्घकालीन आर्थिक सुरक्षा प्रदान करणे.

आरोग्य

अचानक आलेल्या संकाटावर मात करताना, दिर्घकालीन उपायांसाठी तयारी करणे.

शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण

मजबूत भविष्यासाठी तयारी करणे

यश जौहर फाऊंडेशनचे उद्दीष्ट प्रथम मुंबईतील हिंदी चित्रपटसृष्टी मजबूत करणे आहे. त्यानंतर देशातील इतर भागातही मनोरंजन क्षेत्रातील लोकांच्या सक्षमीकरणासाठी फाऊंडेशन काम करणार आहे.

यश जौहर फाऊंडेशन कोविड19 प्रतिसाद 2021

कोरोना महामारीचा मनोरंजन क्षेत्रातील लोकांच्या जीवनावर खूप मोठा परिणाम झाला आहे. लोकांना दोन वेळचं जेवण आणि आरोग्य विषयक सुविधा अशा छोट्या छोट्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व आव्हानात्मक गोष्टी विचारात घेऊन, यश जौहर फाऊंडेशनने यश जौहर फाऊंडेशन कोविड19 प्रतिसाद 2021 या उपक्रमाची सुरूवात केली आहे.

मनोरंजन क्षेत्रातील लोकांच्या दिर्घकालीन आर्थिक सुरक्षेचं ध्येय समोर ठेवून, यश जौहर फाऊंडेशन काही योजनांवर काम करत आहे, ज्या मनोरंजन क्षेत्रातील समाजाला आर्थिक संरक्षण मिळवून देण्याबरोबरच त्यांचे भविष्य सुरक्षित करतील, त्याचबरोबर त्यांच्या मुलांना मनोरंजन क्षेत्रातील भविष्याची योग्य माहिती मिळावी तसेच त्यांचा संशोधनात्मक अभ्यास सुरू राहावा यासाठी त्यांना डिजिटल माध्यम पुरवणार आहे.